प्रतिनिधी-अमोल गायकवाड ( बारामती )
उद्याच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर मला प्रत्येक गावामध्ये यायला मिळेल असे नाही. खूप जणांना फोन येतात, खूप जणांना बोलावलं जातंय त्याच्यामध्ये कदाचित भावनिक केले जाईल. भावनिक व्हायचं की विकास कामाच्या पाठीमागे उभे राहायचं, आपलं भलं करून घ्यायचं तालुकाचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा का तालुक्याच्या विकास कामांना खीळ निर्माण करायची त्याचा विचार सदविवेक बुद्धीला स्मरण आपणच करा. असे मत बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक येथील सभेच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कोराळे (ता.बारामती) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सभेचे आयोजन केले होते. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप ,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर,सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी राजेनिंबाळकर, कोराळे गावचे सरपंच रवींद्र खोमणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले तुम्ही मला आमदार केल्यामुळे तुमच्यामुळे मी उपमुख्यमंत्री झालो. सरकारमध्ये गेलो. सरकार मधल्या योजना सत्ताधारी आमदारांनाा थोड्याशा इजिली मिळतात. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात पाणी मिळतय.असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भोसले तर आभार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील यांनी मानले.
Share this content:
