प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित चाकण येथे रक्तदान शिबिरामध्ये २२४ श्रद्धाळूंनी केले रक्तदान सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या (सर्व माहिती मा.सचिन वाघमारे यांनी दिली)….कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील चाकण आणि राजगुरुनगर ब्रांच यांच्या वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, १७ मार्च २०२४ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये २२४ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये यशवंतराव चव्हाण रक्तपेढीच्या डॉ. मोसलगी यांच्या टीमने २२४ युनिट रक्त संकलन केले. हे रक्तदान शिबीर पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले तसेच या शिबिराला चाकण पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी आनेक पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते. शिबिरदरम्यान आपले भाव व्यक्त करताना राजकीय मान्यवर म्हणाले की निरंकारी भक्तगण चाकण परिसरामध्ये विविध माध्यमातून ज्या सेवा देत आहे हे एक दैविय परोपकाराचे काम आहे. समाजामध्ये लोप पावलेली मानवतेची भावना मिशनचे सेवादार आपल्या सेवेद्वारे जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३७ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७४७७ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,३२,७९५ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे. संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक नरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांनी योगदान दिले तसेच आलेल्या सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार चाकण ब्रांच मुखी मधुकर गोसावी यांनी केले तर वरील सर्व माहिती मा.सचिन वाघमारे यांनी दिली.

Share this content:
