प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले शिवाजीदादा आढळराव पाटलांना भोसरीतून लाखांपेक्षा अधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी माझी-आमदार महेश लांडगे
●भोसरी जुन्नर विधानसभेतून आढळराव यांना मताधिक्य देण्याचे बावनकुळेंचे आवाहन
पुणे- भारताच्या नावाचा जगात दबदबा निर्माण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदासाठी तिसऱ्यांदा हात बळकट करायचे आहेत. त्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभा मतदार संघातून लाखांपेक्षा अधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी माझी आहे.असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली दहावी येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला संबोधित करताना श्री.लांडगे यांनी आढळराव यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगितले.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदर युक्त दबदबा निर्माण आहे.त्यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे.या मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे मतदार संघात कधी फिरकले नाहीत. त्यांच्या नाकर्तेपणाला, मागील पाच वर्षात मतदार संघात जास्तीत जास्त कामं केलेल्या आढळरावांना निवडून देऊन ,मोदींचे नेतृत्व बलशाली करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीस महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, शरद बुट्टे पाटील, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, आबा सोनावणे, संतोष खैरे आदींसह शिरूर लोकसभेतील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Share this content:
