प्रतिनिधी – आरिफ भाई शेख
लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणून मतदान प्रक्रियेकडे पाहिले जाते शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राजकीय हॉटस्पॉट ठरत आहे चुरस असणाऱ्या या लढतीमध्ये. कार्यकर्ते एकवटले आहेत. परंतु यावेळी चे चित्र मात्र वेगळे आहे शरद पवार गटाकडून प्रचार करत असताना आळंदी मध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस आय कमिटी एकत्र येत प्रचार करताना दिसत आहेत तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत आहे. सामान्य मतदाराला मतदान करण्यासाठी भूमिका पटवून देण्यासाठी मोठ्या उन्हात पायपीट केले जातात. दोन्ही गटाकडून नियोजन ठरलेला आहे. सकाळच्या फेरी नंतर ऊन उतरायची वाट बघत संध्याकाळच्या फेरीचे नियोजन केले जात आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचारामध्ये सक्रियता वाढल्याची दिसून येत आहे. तर आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे साठी सदरचे मतदान हे प्रतिष्ठित म्हणून पाहिले जात आहे. शरद पवार गटाकडून विशेष दखल घेत खेड तालुक्याला पर्यायाने शिरूर लोकसभा मतदारसंघ यामधील मतदार राजाला जनजागृती करणे कामी भूमिका पटवून दिली जात आहे. यात मात्र विशेष दखल घेण्याची बाब अशी की महाराष्ट्र राज्यांमधील सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरती आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पर्यायाने सर्वात कमी असे मतदान झाले आहे देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान होणे ही अपेक्षा होती परंतु बारामती नंतर पुण्यामध्ये होता सरासरी मतदान झाल्याचे दिसून आले त्यामुळे शरद पवार गट अजित पवार गट या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मतदानाची टक्केवारी वाढवण्याची विशेष जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे वाटते. कारण जागृत मतदारांनी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत मतदान भले मग ते कोणत्याही घटना करा पण मतदानाचा हक्क बजावणी करणे याबाबत विशेष दक्षता घेतली पाहिजे येणाऱ्या काळात कोण कोणाची सरशी करते आणि बाजी कोण मारणार याबाबत मात्र कुतूहल आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप शिवसेना हातात हात घालून प्रचार करत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस आय कमिटी कार्यकर्ते एकमेकांच्या मदतीने जनजागृती करत प्रचार करताना दिसून आले ही बाब इतर निवडणुकीपेक्षा आश्चर्यकारक आणि वेगळी वाटते
Share this content:
