प्रतिनिधी – आरिफ भाई शेख
आज नरसिंह जयंती निमित्त माऊलींचे मंदिरामध्ये नरसिंह अवतार चंदन उटी साकारण्यात आली. उन्हाळ्यातील उष्माचा श्री संत शिरोमणी माऊलींना त्रास होऊ नये यासाठी समाधीवर चंदन ओटी साकारण्याची परंपरा आहे. चैत्र पाडव्यापासून या ओटी ला सुरुवात होते दररोज दुपारी चंदनाची ओटी माऊलींच्या समाधी मंदिरावर साकारली जाते. विविध रूपे साकारत माऊलींच्या समाधीवर शुद्धचंदनाचा गारवा दिला जातो. त्याच स्वरूपात आज नरसिंह जयंतीनिमित्त श्री नरसिंह अवतार साकारण्यात आला होता भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी समाधी मंदिरात असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर विर यांनी दिली आहे. नरसिंह जयंती निमित्त सायंकाळी पाच ते सात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह भ प तुकाराम महाराज मुळीक यांचे जन्माचे कीर्तन सायंकाळी पाच ते सात या वेळेत पार पडले यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजन नाथ जी हे उपस्थित होते. या मन मोहक नरसिंह स्वामींच्या अवताराचे दर्शन घेताना भाविकांनी गर्दी केली होती.
Share this content:
