खरपुडी बु.
प्रतिनिधी – दत्ता भगत
खेड तालुक्यातील साने गुरुजी विद्यालय, खरपुडी
बुद्रुक येथे तालुक्यातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची सह विचार सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी आदर्श गटशिक्षणाधिकारी अमोलजी जंगले , जीवन कोकणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पिंपरी केंद्रातील आदर्श केंद्रप्रमुख विजय सुरकुले व खेड तालुक्यातील सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा पूर्वतयारी,अनधिकृत शाळा,डीबीटी ऑनलाईन मागासवर्गीय शिष्यवृत्ती रजिस्ट्रेशन,पाठ्यपुस्तक वाटप,गणवेश वाटप,सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वाटप,सौर पॅनल आवश्यकता,पाचवी व आठवी शिष्यवृत्ती तयारी,आधार अपडेट,बांधकाम आढावा, याविषयी सविस्तर चर्चा झाली.
Share this content:
