वडगाव निंबाळकर – अमोल गायकवाड
बारामती कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी वादळ वारे व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे निरा बारामती रोड वरती चिंचेचे झाड रस्त्यावर पडले त्यामुळे निरा बारामती रस्त्यावरती वाहतूक ठप्प झाले आहे. कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी एसटी स्टँड जवळ चिंचेचे झाड पडल्यामुळे बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या शालेय विद्यार्थी त्याचबरोबर वृद्ध यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे चित्र दिसून आले.झाड कोसळलेले समजताच कोराळे बुद्रुकचे सरपंच सोन्याबापु खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी तत्काळ त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.
Share this content:
