प्रतिनिधी : उत्तम खेसे .
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) आणि महिला शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. शिक्षक आमदार स्व. शिवाजीराव पाटील यांच्या 9 व्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय जीवन गौरव व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन रविवार दि.9 जून 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते .खांडगे लाँन्स कार्यालयात १७ पुरस्कार विविध मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले . याचे उत्कृष्ट नियोजन खेड तालुका टीडीएफ संघनेचे शिक्षक यांनी केले .टीडीएफ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर मांजरे, उपाध्यक्ष खुटवड, पदाधिकारी दिलीप ढमाले ,खेड ता अध्यक्ष सत्यवान ठाकूर, सचिव संतोष गाडेकर, सिताराम दिघे, एकनाथ टोपे, सुनिल घुमटकर , ताम्हाणे सर, म्हसे सर, चौधरी सर इत्यादी पदाधिकारी कार्यानी उत्कृष्ट नियोजन केले . चहा नाष्टा भोजन याची सोय होती . सुरुवात चांगली कार्यक्रम शेवट ही आकर्षक झाला . असा सुर खेड तालुक्यात झाला . मे, जुन शाळेच्या सुट्टीच्या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला टीडीएफ संघटनेचे कौतुक होत आहे .
Share this content:
