श्री.मनोहर गोरगल्ले
पुणे येथील बी. टी. कवडे रोड या ठिकाणी कांबळे कुटुंबीयांची महार वतनातील जमीन तेथील काही लोकांनी बळकवण्याचा आरोप लक्ष्मी कांबळे यांनी केला आहे आणि एकही रुपयांना न देता खोट्या सह्या देत सातबारा तयार केला आहे. स्वतःचे नावे चढवून घेतली व जमिनीचा ताबा आपल्या बळावरती घेऊन त्यांना या जमिनीतून बेदखल करण्यात आले आहे. समाजात गरीब लोकांना असे धमकावून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर शहरी भागात असे घडत असेल तर ग्रामीण भागात कसे असेल ? शासन- प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही. कलेक्टर साहेबांनी ह्या विषयाकडे जातीने लक्ष दिलेच पाहिजे. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवरच हा अन्याय का होतो ? समाजात बऱ्याच ठिकाणी हे प्रकार घडत आहे. व ज्या लोकांनी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांच्या जमिनी बळकावल्या आहे त्या सर्वांना मिळाव्या. व अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कांबळे कुटुंबीयांची जागा मिळून न्याय मिळाला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आखिल माथाडी व जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष, खेड तालुका युवक अध्यक्ष आकाशभाऊ डोळस यांच्या नेतृवाखाली संपर्ण पुणे जिल्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याचवेळी निवेदन देताना पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl ( A) महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष व खेड तालुका युवक अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। आकाश भाऊ डोळस समाज सेविका सिद्धिका आकाश डोळस , खेड तालुका युवक उपाध्यक्ष निलेश भाऊ भोसले कार्यकर्ता उपस्थित होते
Share this content:
