खरपुडी बुद्रुक
प्रतिनिधि दत्ता भगत
खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील खाजगी दुध संकलन केंद्र या ठिकाणी गुरुवारी रात्री ८ च्या सुमारात तीन जणांना मारहाण करून बेकायदा गर्दी गोळा करून तलवार, कोयते व हॉकीस्टिक नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे दिसून येत आहे. समाजात बदला घेण्याच्या उद्देशाने खूप षड्यंत्र केले जातात पण हे जीवे मारण्याचा प्रयत्न योग्य नसून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.या मध्ये असलेले तीन आरोपींना अटक झाली असून त्याचे साथीदार मात्र बाहेर फिरत आहे. ह्या हल्ल्यामध्ये महेश बात्तले, सौरभ गायकवाड, शिवकुमार बात्तले. यांना गंभीर जखमी केले असून त्यांना योग्य न्याय मिळावा. व उद्या यांच्या घरच्यांना किंव्हा इतरांवर हल्ला झाला तर याला जबाबदार हेच आरोपी असतील व जे आरोपी आजूनही बाहेर फिरत आहे त्यांच्यवर हि गुन्हे दाखल करावे. सराईत गुन्हेगार खूप दिवसांपासून अनेक प्रकारचे गुन्हे करत आहे तरी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना १० ते १५ वर्षांसाठी गावातून बेदखल करण्यात यावे जेणेकरून त्यांच्यामुळे गावात जे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे ते कमी होईल.अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आखिल माथाडी व जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष, खेड तालुका युवक अध्यक्ष आकाशभाऊ डोळस यांच्या नेतृवाखाली संपर्ण खेड तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याचवेळी निवेदन देताना पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl ( A) महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष व खेड तालुका युवक अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। आकाश भाऊ डोळस ,समाज सेविका सिद्धिका आकाश डोळस ,खेड तालुका युवक उपाध्यक्ष निलेश भाऊ भोसले हे कार्यकरते उपस्थित होते 
Share this content:
