

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले आमराळवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा आमराळवाडी दावडी शाळा खेड तालुक्यात द्वितीय क्रमांक
माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील विजेत्यांची घोषणा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून खेड तालुक्यात जि प प्राथमीक शाळा अमरावती दावडी द्वितीय क्रमांक मिळवून दोन लाख रुपये बक्षीसांची मानकरी ठरली. महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय व खाजगी शाळांसाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचे मागील २०२३-२०२४ या वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. शाळांसाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा शाळांसाठी उपलब्ध व्हाव्यात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने राज्य शासनाने या स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र , बीट , तालुका , जिल्हा व राज्य या टप्प्यात शाळांचे मूल्यमापन करून तालुका , जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या शाळांना भरघोस बक्षीसे या स्पर्धेअंतर्गत देण्यात येत आहेत.
हे अभियान ५ ऑगस्ट २०२४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आले आहे.दुसऱ्या टप्प्यासाठी पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादनूक या प्रमुख घटकांवर आधारित १५० गुणांचे स्पर्धात्मक उपक्रम राबविले होते.तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तीन लाख , द्वितीय क्रमांक दोन लाख आणि तृतीय क्रमांक एक लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.शाळेला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळण्यामध्ये ग्रामपंचायत दावडी शाळा व्यवस्थापन समिती आमराळवाडी त्याचबरोबर आमराळवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शिक्षणाधिकारी माननीय मा.श्री संजय नाईकडे साहेब ,गटशिक्षणाधिकारी मा.अमोलजी जंगले साहेब , विस्तार अधिकारी मा.दत्तात्रय गोसावी साहेब व शेलपिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. नवनाथ भूमकर साहेब यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Share this content:
