



प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पंचायत समिती खेड आरोग्य विभाग यांचे वतीने 21 मार्च 2025 रोजी आरती एक्झिक्युटिव्ह चाकण या ठिकाणी आशा डे साजरा केला.सदर कार्यक्रमाला 320 पेक्षा जास्तआशा कार्यकर्ती व 17 आशा गटप्रवर्तक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सन 2023- 24 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या तालुकास्तरावरील प्रथम द्वितीय व तृतीय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रथम आशा कार्यकर्ती यांचा सन्मान करण्यात आला .त्याचप्रमाणे तालुकास्तरावरील प्रथम व इतर सर्व गटप्रवर्तक यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात स्वादिष्ट जेवण देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांच्या नेतृत्वाखाली व तालुका समुह संघटक श्री निलेश बेलवटे यांचे कार्यक्षमतेने सदर कार्यक्रम पार पाडला.खेड तालुक्यातील 11 प्रा आ केंद्र व 60 उपकेंद्र यांतुन सर्व आशांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.वैद्यकीय अधिकारी डाॅ.इंदिरा पारखे तालुका कार्यालय पं. स. खेड येथुन श्रीम. आशा नवगिरे,आशा नाईकडे,रेवननाथ ढाकणे ,सानिका घाटकर, उपस्थित होते.आरोग्य सेवक श्री. नितिन भुसारी,श्री. प्रतिक गवारी तसेच श्री केतन घोलप ,श्रीमती वैष्णवी पवार यांनी विशेष परिश्रम केले.
सर्व आशा कार्यकर्ती यांनी आपले दैनंदिन सेवा देतानाचे अनुभव आणि बळकटीकरण व्यक्त केले
तसेच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यात आला.
शेवटी सर्व गटप्रवर्तक यांनी मान्यवरांचे आभार मानुन सदर कार्यक्रम संपन्न झाला
Share this content:
