
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटनेने २१ मार्चला संघटनेच्या कामाची सुरुवात म्हणून “गंगातारा वृद्धाश्रम, वडकी” येथे भेट दिली. आणि तेथील वृद्ध आणि लहान मुलांना अन्नदान करण्यात आले.यावेळी पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे पदाधिकारी पुणे जिल्हा उपाध्यक्षा प्रीतीताई कार्लेकर, पुणे शहर उपाध्यक्षा शिल्पाताई माने, पुणे शहर निरीक्षक निशिगंधाताई थोरात, तालुका उपाध्यक्ष अर्चनाताई सूर्यवंशी, तालुका निरीक्षक आशाताई कांबळे, शाखाप्रमुख अरुणाताई कापसे, पूजाताई मुंगळे, दिपालीताई शिरसागर, विशाल डोंगरे, शाखाप्रमुख गौरव घोलप हे उपस्थित होते.
महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोकदादा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्षा प्रीती ताई कार्लेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून हे नियोजन केले होते. हे “गंगातारा वृद्धाश्रम” लक्ष्मी ताई माने आणि निताताई भोसले यांच्या मार्फत चालवले जाते. ज्यांचे खरेच कोणी नाही अशा गरजू वृद्धांना आणि लहान मुलांना या वृद्धाश्रमात प्रवेश दिला जातो. वृद्धांच्या नातेवाइकांकडून कसल्याही प्रकारची फी स्वीकारली जात नाही. मोफत चालवल्या जाणाऱ्या या वृद्धाश्रमात वृद्धांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गंगातारा वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांच्या तसेच लहान मुलांच्या सोबत चर्चा केली.
त्यांनी रक्ताच्या नात्यांनी घराबाहेर काढल्याचे अतिव दुख व्यक्त केले. मात्र, वृद्धाश्रमाने सहारा दिल्याने आता जगण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळे आमची दिवाळी आनंदात जातेय. रक्ताचे नाते निष्ठूर बनलेय वृद्धाश्रमात मायेची ऊब मिळाली.अशी भावना वृद्ध महिलांनी ‘पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटने’कडे व्यक्त केली. लक्ष्मी ताई माने आणि निताताई भोसले यांना सर्वजण ‘मम्मी’च म्हणतात.
वृद्धाश्रमात राहणाऱ्या काही महिलांना स्वत:चा मुलगा किंवा मुलगी नाही. त्यामुळे पती मरण पावताच त्या निराधार झाल्या. जवळच्या एखाद्या नातेवाईकाने त्यांचा काही दिवस सांभाळ केला. मात्र, काही दिवसांतच घराबाहेर काढले. काहींना तर मुलगा, मुलगी आहे. मात्र, ते वृद्ध महिलांचा सांभाळ करण्यास तयार नाहीत. अशातच वृद्धाश्रमात चांगल्या साेयीसुविधा मिळतात. त्यांच्या आराेग्याची नियमित तपासणी देखील केली जाते. सर्व जीवनावश्यक वस्तू ‘मम्मीं’कडून आम्हाला दिल्या जातात. त्यामुळे त्या घरच्यापेक्षाही आंनदी व सुखी आहेत. त्यामुळे आता घराकडे परतायचे नाही. येथून अंत्यविधी निघेल, अशी प्रतिक्रिया जड अंतकरणाने वृद्ध महिलांनी ‘पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटने’शी बोलताना व्यक्त केली. तसेच ‘मम्मी’ आमच्या शिक्षणाचा खर्च करतात. आम्हाला जेवण आणि सर्वच गोष्टी वेळेवर भेटतात. आम्हाला आई वडिलांची कमतरता अजिबात जाणून देत नाहीत. अशी प्रतिक्रिया लहान मुलांनी ‘पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटने’शी बोलताना व्यक्त केली.वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणे हे प्रत्येक मुलाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, समाज बदलत चालला आहे. वृद्धांना घराबाहेर काढले जाते. अशावेळी कुठे निवारा मिळेल या चिंतेने वृद्ध नागरिक हाय टाकलेला असताे. त्यांना आधार मिळावा, याच उद्देशाने हे वृद्धाश्रम चालविले जात आहे.
Share this content:
