प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
धामणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पाच वर्षात तिसर्यांदा भव्य जिर्णोद्धार ग्रामस्थ व शिक्षकांच्या पुढाकाराने करण्यात आले व सजले देखणे ज्ञानमंदिर!धामणे प्राथमिक शाळेचा पाच वर्षात तिसर्यांदा जिर्णोद्धार झाला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.पाच वर्षापुर्वी रोटरी क्लबच्या भरीव सहकार्याने छोटेखानी असणार्या शालेय इमारतीचा कायापालट झाला. विनोद पाटील साहेब आणि रोटरीयन्सच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागली. नवीन पत्र्यांचे छत, स्वच्छतागृह, प्रवेशद्वार, व्यासपीठ, क्रिडा साहित्य, अशी मोठी कामे रोटरीने केली. ग्रामस्थांच्या देणगीतून राष्ट्रपुरुषांच्या तैलचित्रांनी भिंती सजल्या, शाळेची भव्य एकसष्टी आणि तालुकास्तरीय मराठी राजभाषा दिन सोहळा दृष्ट लागावी अशा उत्साहात संपन्न झाला!आणि निसर्ग चक्रीवादळानं नटली सजलेली शाळा एका रात्रीत उद्ध्वस्त झाली.दृष्ट लागल्यागत होत्याचे नव्हते झाले.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार डाॅ.अमोल कोल्हे, आमदार दिलीपशेठ मोहिते पा. जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, सदस्य शरद बुट्टेपाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब आदींनी भेटी दिल्या. पुन्हा एकदा ग्रामस्थ शिक्षकांनी कंबर कसली, मा.आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या भरीव योगदानातून आणि जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, शरदराव बुट्टेपाटील यांच्या साह्याने भव्य आर.सी.सी. इमारत अल्पावधीत उभी राहिली. कच्छ अॅग्रोचे दिलीपशेठ शहा यांनी संपुर्ण शाळेचे रंगकाम केले. दुसर्यांदा जिर्णोद्धार झाला.युवा मंत्री नामदार अदितीताई तटकरे व मान्यवरांच्या शुभहस्ते इमारतीचा उद्घाटन सोहळा झाला!आणि आता तिसर्यांदा जिर्णोद्धार झाला तो ‘किंग्फा’ कंपणीच्या माध्यमातून, एच.आर. राहुल कुंभारे साहेब, युवा उद्योजक सचिन पानमंद आणि सहकार्यांच्या माध्यमातून सातही वर्गखोल्यांना नवीन फरशी, शालेय इमारतीसमोर साधारण बारा गुंठ्याला पेव्हिंग ब्लाॅक, दोन एकर परिसर असणार्या शालेय आवाराला रंगकामासह भक्कम संरक्षण भिंत!ग्रामस्थांचे सहकार्य, दानशूर देणगीदारांची साथ, कंपनी अधिकार्यांचे जिवलग मैत्रीपुर्ण संबंध यातून साकारलेल्या देखण्या कामानं शाळेचा भौतिक विकास साधला. माजी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या विशेष सहकार्यातून आणि योगदानातून शाळेची आर.सी.सी. इमारत उभी राहिली. माजी आमदार स्व.सुरेशभाऊ गोरे यांनी धामणे गाव/शाळा दत्तक घेतली होती. विद्यमान आमदार बाबाजीशेठ काळे यांनी धामणे शाळेची ‘माॅडेल स्कूल’ उपक्रमासाठी शिफारस केली. आज खेड तालुक्यातील ४०२ + शाळांमधून ३५ शाळांची ‘माॅडेल स्कूल’ म्हणून निवड झाली. यामध्ये धामणे शाळेचा अग्रक्रमाने समावेश झाला असून साधारण ५४ लाख रु. निधी सर्वांगिण भौतिक विकासकामांसाठी येणार आहे.राजाश्रय आणि लोकाश्रयाचा उत्तम मिलाफ साधत धामणे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, पालक आणि शिक्षकवृंद यांनी शाळेचा चौफेर भौतिक अन् बौद्धिक विकास साधला आहे. धामणे शाळेला लाभलेले गुरुवर्य मारुती जरे, अनिल बोर्हाडे, अमर केदारी, मंगल पिंगळे, गोरख नवले आणि मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांच्या अथक परिश्रमातून शालेय गुणवत्ता, स्काॅलरशिप, भजन, कला-क्रिडा आदी सर्व क्षेत्रात धामणे शाळेचे नाव आणि दबदबा सर्वदूर पसरला आहे.अशा या आदर्श शाळेचा पाच वर्षात तिसर्यांदा झालेला भव्य जिर्णोद्धार आणि आता ‘माॅडेल स्कूल’ मधील समावेशाने धामणे ग्रामस्थ मनोमन सुखावले आहेत.
Share this content:
