
प्रतिनिधी : उत्तम खेसे.
तळेगाव दाभाडे, दि. २८ (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तसेच नगरसेवक संतोषभाऊ भेगडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे (ग्रामीण ) या संघटनेचे अध्यक्ष श्री . निलेश काशिद यांनी ही संघटना फार पूर्वी पासून कार्यरत असून अनेक शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत .ही संघटना पदाधिकारी जुनी पेन्शन मिळावी तसेच अनेक वैद्यकीय बिले , शैक्षणिक महागाई भत्ते , शैक्षणिक हिताची कामे करीत आहेत . आपण कोणत्या तरी संघटनेचे सभासद असावे ही काळाची गरज आहे .त्यामुळे अशक्य कामे ही शक्य होतात .या वेळेस त्रिमूर्ती विद्यालय तिन्हेवाडी विद्यालयाचे खेड तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष : श्री बाळासाहेब वायकर यांना जिल्हा पुरस्कार प्रदान झाला .नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठाण पुणे . या संस्थेतील माध्यमिक विद्यालय काशिग ता मुळशी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे श्री अशोक गायकवाड यांनाही पुरस्कार प्रदान झाला .तसेच उत्तम निवेदक , प्रसिद्ध वक्ता ,समाजसेवक आदर्श शिक्षक श्री . राजेंद्र नाईकरे सर – मुळशी धरण प्रशाला पोमगाव या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे यानांही जिल्हा पुरस्कार प्रदान झाला .पुरस्कार प्रदान होताना राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी श्री गुलाबराव गवळे सर , कार्यवाह महेश शेलार सर उपाध्यक्ष अरविंद गवळे सर ‘ , जिल्हा कार्यकारणी सदस्य उत्तमराव खेसे उपस्थित होते .आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कारार्थी यांना पुरस्कार प्रदान झाले .
Share this content:
