प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सौरंग्या ग्रुप व झुम्मा ग्रुप राजगुरुनगर यांनी सर केला
सौरंग्या ग्रुप, झुम्मा ग्रुप राजगुरुनगर यांनी शनिवारी 27 सप्टेंबर 2025 रोजी राजगुरुनगरच्या सौरंग्या व झुम्मा ग्रुपने 20 जणांनी कळसुबाई शिखर सर केले, विनोद केदारी,अजिनाथ पाखरे सर, मुख्याध्यापक लतीफ शेख सर, प्राचार्य अंकुश केंगारे,व सर्व मित्रांनी जाण्याचे नियोजन केले. नवरात्र शारदोत्सव उत्सवामध्ये कळसुबाई माता भक्तीचे शक्तीची इच्छेची जिद्दीचे संयम सचोटी मानसिक शारीरिक भावनिक मैत्रीची विचारधारा घेऊन कळसुबाईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. प्रत्येकाने गाण्याच्या गप्पागोष्टीचा जीवन म्हणजे काय स्वतः जगण्याचा मनसोक्त आनंद घेतला. रामदास शिंदे भाऊसाहेब यांच्या मित्रांनी राहणे जेवणाची व्यवस्था चांगली केली होती. संध्याकाळी भोमाळे सर, कोकणे सर, प्राचार्य केंगारे, अंकुश सर यांनी भजनाचा आनंद घेतला प्राचार्य केंगारे सर यांनी अध्यात्मिक भारुड, संतांनी घालून दिलेली वचने यावर अंधश्रद्धा व मानवी जीवनातील रूढी परंपरा भक्ती याविषयी माहिती दिली. पोटदुखे पर्यंत मनसोक्त हसवले. कळसुबाई चढायला सकाळी साडेआठ वाजता सुरुवात केली. रस्ता अवघड वाळण्याचा दगड धोंड्याचा जंगलाचा तीन सीडीचा व पावसातून बारा वाजता वरती पोहोचलो. प्राचार्य केंगार सर वय 62 वर्षे व निकास सर वय 60 वर्षे असे सर्वजण 40 ते 62 वयोगटातील होते. ओझर भंडारदरा धरण कळसुबाई ट्रेक मित्राच्या जिद्दीने इच्छा शक्तीमुळे पार पडला. यातून तुमच्या शरीराचे ऑडिट कार्यक्षमता मसल पावर ताकत शक्ती कळते रक्तातील ब्लॉकेज निघतात ट्रेकिंग साठी पाखरे सर, विनू केदारी, लतीफ शेख सर ,मुख्याध्यापक प्राचार्य अंकुश केंगारे ,रामदास शिंदे, भाऊसाहेब कोकणे सर ,बोमाळे सर, तानाजी पाचारणे व कैलास मुळूक , ऍडवोकेट तळेकर ,वाळुंज राहुल ,शांताराम शिंदे सर ,संजय पडवळ ,सोमनाथ तागड सर, पोखरकर सचिन ,कुंडलिक गारगोटे सर, हेमंत कारोटे मारुती भोमाळे ,निकास रमेश , आजिनाथ पाखरे, नवनाथ कोकणे, कैलास मुळक ,एडवोकेट संतोष तळेकर, पुंडलिक गारगोटे ,सचिन पोखरकर अशा वीस जणांनी सहकार्य केले. या ट्रेकिंग मधून शरीराची कार्यक्षमता कळते मैत्रीच्या नाते घट्ट होते. सकारात्मक ऊर्जा मिळते आनंद मिळतो एकंदरीत आमची टूर वीस जनांची आनंददायी झाली. यापुढे दर महिन्याला डोंगर किल्ले ट्रेकिंगचे नियोजन करण्याचे ठरले.
Share this content:
