प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दावडी या प्रशालेचा एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 चा निकाल 98.46 टक्के लागला. विद्यालयातील एकूण 65 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले त्यापैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य धारक 19 व प्रथम श्रेणीधारक 22 विद्यार्थी आहेत विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक कु. येवले वैष्णवी अनिल 94.80% ,द्वितीय क्रमांक कोठावळे ऋषिकेश विजय 90.20%, तृतीय क्रमांक कु. गाडगे अस्मिता अनिल 89% सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पश्चिम विभाग सल्लागार समितीचे सदस्य श्री सुरेश डुंबरे पाटील,विद्यालयाचे प्राचार्य डी. पी.फापाळे, पर्यवेक्षक, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,माता पालक संघ, पालक शिक्षक संघ व सर्व ग्रामस्थ दावडी यांनी अभिनंदन केले


Share this content:
