प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
मुंबईचा डबेवाला कामगार यांचा पुतळा हाजीअल्ली येथाल चौकात महानगर पालिकेचे तात्कालीन आयुक्त अजोय मेहता यांचे हस्ते बसवण्यात आला होता. सध्या हा पुतळा तेथुन काढण्याचे कारस्थान चालू झाले होते पहीले येथील वहातुक बेट RPG कंपनीकडे देखभाल करण्यासाठी होते आता हे बेट दुसर्या कंपनीने देखभाल करण्यासाठी घेतले आहे आणी त्या कंपनीला हा पुतळा तेथे नको आहे त्यांना त्यांची जाहीरात तेथे करायची आहे म्हणुन काही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा पुतळा येथुन काढायचे कारस्थान चालू झाले होते याची कुणकुण “ मुंबई डबेवाला असोशिएशन” ला लागल्या नंतर असोशिएन ने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, मुंबई महानगर पालिका आयुक्त यांचेशी पत्र व्यव्हार केला व पुतळा हटवू नका अशी विनंती केली..हा पुतळा म्हणजे मराठी कामगार यांची अस्मीता आहे आम्ही हा पुतळा येथुन हटवू देणार नाही वेळ प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसू पण पुतळा हटवू देणार नाही. अशी भुमीका “ मुंबई डबेवाला असोशिएशन” ने घेतली त्याला यश आले व आज मुंबई महानगर पालिकेचे पत्र आले त्या पत्रात स्पष्ट लिहले आहे की पुतळा हटवण्यात येणार नाही.
आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महानगर पालिका आयुक्त यांचे आभारी आहोत.
Share this content:
