प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले खेड तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये विषमज्वराच्या तीव्र साथीबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी लेखी निवेदनाद्वारे
मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.पुणे,जिल्हा आरोग्य अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी खेड यांच्याकडे केली आहे.खेड तालुक्यातील कनेरसर,पुर,वरूडे परिसरातील गावांमध्ये गेली तीन महिन्यांपासून विष्मज्वरामुळे जवळपास १५० रूग्ण त्रस्त आहेत.वाफगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कनेरसर येथील उपकेंद्रामध्ये रोगनिदान चाचणी व उपचार याची पुर्तता होत नसल्याने नागरिक खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.विषमज्वरावर उपचार घेतल्यानंतर रूग्णांना बरे वाटते,परंतु नंतर हात पाय तीव्रतेने दुखणे,सांधे दुखणे,चालण्यास त्रास होणे,पायाला सुज येणे असे त्रास रूग्णांना होत आहेत.यातील बरीचशी लक्षणे चिकनगुणिया,डेंग्यु या आजाराची आहे.रूग्ण खाजगी दवाखान्यात जाऊन वेदनाशामक गोळ्या- औषधे घेतात,तात्पुरते बरे वाटते,काही वेळाने पुन्हा वेदना सुरू होतात.खाजगी दवाखान्यातील डाॅक्टर पाच ते सहा महिने त्रास राहील असे सांगत आहेत.दिलीपराव माशेरे,काळुराम दौंडकर,रमेश दौंडकर,दत्तात्रय केदारी,गोरक्ष दौंडकर यांनी तीव्र वेदना होत असून बाहेर फिरणे मुश्कील झाल्याचे विशद करून यावर उपाययोजना झाली पाहिजे असे मत व्यक्त केले असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी.तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव यांच्या सहकार्याने तातडीने विषमज्वराने त्रस्त झालेल्या रूग्णांसाठी शिबीर आयोजित करून तज्ञ डाॅक्टरांच्यावतीने तपासणी करून निदान करावे व उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे. विषमज्वराबरोबर डेंग्यु किंवा चिकनगुनिया या आजारांचीही लागण झाल्याची शंका रूग्ण व्यक्त करीत असून,आरोग्य विभागाने याची तपासणी करून रूग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी टाव्हरे यांनी निवेदनात केली आहे.
hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Auto;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 139.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~25: 0.0;
Share this content:
