प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे गुरुवारी दुपारी एक वाजता हल्ला करण्यात आला. झावरे हे पारनेर बसस्थानका जवळ वाहनात(गाडी) असतानाच वाहनांच्या काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात येणार आहे. हल्ला झालेले निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर नगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. निवडणूक झाले वर हार-जीत होणारच असते. मग आपण आपल्याच माणसांवर हल्ले करतो. यातून वादविवाद निर्माण होतो. पारनेर मध्ये झालेल्या ह्या हल्ल्यात आणखी लोकांचा जीवही जाऊ शकतो. राहुल झावरे यांना न्याय मिळावा. व या सर्व घटनेची सखोल चौकशी करून या माघील कारण शोधून योग्य व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आखिल माथाडी व जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष, खेड तालुका युवक अध्यक्ष आकाशभाऊ डोळस यांच्या नेतृवाखाली संपर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन खेड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl ( A) महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष व खेड तालुका युवक अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खुर्द आकाशभाऊ डोळस ,अजय भाऊ कैादरे संदेश खंडीजोज व इतर मान्यवर कार्यकरते उपस्थित होते.
Share this content:
