सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
आळे गावच्या विद्यमान सदस्या लताताई वाव्हळ व विद्यमान सदस्य मुकुंद भंडलकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे व ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल आळे याठिकाणी करण्यात आला. यावेळी जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके यांच्या पत्नी गौरीताई बेनके यांच्या शुभहस्ते वृक्षरोपण १०० लावण्यात आले .यावेळी नेताजी डोके (ज्ञानराज इंग्लिश स्कूल आळे, अध्यक्ष )सुप्रिया लेंडे. प्रितम काळे (सरपंच) मंगेश कुऱ्हाडे (उपसरपंच) दिगंबर घोडेकर ( ग्रा.पं सदस्य आळे ) मंगलताई तितर ( ग्रा.पं सदस्य आळे) सविता भुजबळ (ग्रा.पं सदस्य आळे) बाजीराव लाड (ग्रा.पं सदस्य आळे )जयश्री डावखर (ग्रा.पं सदस्य आळे ),दिलीप आप्पा वाव्हळ, सुधिर वाव्हळ ,अपेक्षा कुऱ्हाडे उपस्थित होते .
Share this content:
