प्रतिनिधी-संतोष गाडेकर
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टीडीएफ, पुणे जिल्हा शिक्षिका संघ आयोजित राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार राजगुरूनगर ता.खेड येथे संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये एकूण १७ पुरस्कार खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. दिलीपराव मोहिते पा. यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष मा. आमदार नानासाहेब बोरस्ते होते. प्रमुख पाहुणे मा.आमदार राम कांडगे, मा.आमदार पोपटराव गावडे, पुणे जि.प. शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर साहेब, मा.के.एस.ढोमसे अध्यक्ष म.रा. माध्य.उच्च माध्य.शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ,राज्याचे कार्याध्यक्ष जी.के.थोरात, टीडीएफ सचिव हिरालाल पगडाल, राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष हणमंतराव भोसले,वरील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदस्य जनरल सभा रयत शिक्षण संस्था श्री. उदय बेंडे पा.पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे, पुणे विभाग माध्य. शिक्षक संघांचे सचिव सचिन दुर्गाडे, पुणे जिल्हा टीडीएफ अध्यक्ष मुरलीधर मांजरे, जिल्हा माध्य.शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, जिल्हा शिक्षक संघाचे सचिव पंकज घोलप,जिल्हा टीडीएफ कार्याध्यक्ष तानाजी झेंडे,पुणे शहर माध्य.शिक्षक संघ अध्यक्ष राज मुजावर, सौ.स्नेहल बाळसराफ,श्री.सोमनाथ भंडारे,सौ.सविता ताजणे इ. मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक श्री. मुरलीधर मांजरे यांनी केले. आभार पुणे जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री.दिलीप ढमाले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड तालुका माध्यमिक शिक्षक / शिक्षिका संघ व टीडीएफ अध्यक्ष सत्यवान ठाकूर, एकनाथ टोपे, रामचंद्र कोहिनकर,आनंदा ढोरे, दत्तात्रय वंजारी, शांताराम खुटवड, अजय पोंदे, संजय सहाणे, तुकाराम ताम्हाणे, पत्रकार संतोष गाडेकर,दत्तात्रय येवले, माणिक पवार,गणेश कुंभार,रेखा भोकटे, माधुरी काळभोर यांनी विशेष परिश्रम केले.तसेच पुणे जिल्ह्यातून बहुसंख्येने शिक्षक/ शिक्षिका उपस्थित होते.

Share this content:
