खेड तालुक्यातील खरपुडी गावचा कु.निखिल भोगाडे राज्य विक्रीकर निरीक्षक STI पदी राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली.घरची गरीब परिस्थिती लहानपणीच वडीलांचे छत्र हरपले.आई शेतात मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. अशा परिस्थितीत आयुष्याचे सोने करत खरपुडी बुद्रुक (ता. खेड) येथील निखिल शिवाजी भोगाडे याची राज्य विक्रीकर निरीक्षक अधिकारी(STI )पदी राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यापुर्वी मागील महिन्यात सहायक कक्ष अधिकारी (ASO)पदी मंत्रालयात त्यांची निवड झाली होती.इयत्ता पहिलीमध्ये असताना निखिलच्या वडिलांचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत आणि इयत्ता दहावीपर्यंत खरपुडी येथील साने गुरुजी विद्यालयात बीए अर्थशास्त्र शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चाकणला सुट्टीत येथे खासगी कंपनीत काम केले.काॕलेज सुटल्यावर खेड मार्केटमध्ये भाजी भरण्याचे काम करून शिक्षण चालू ठेवले. या दरम्यान त्याला समजले की आपण जर काम केले तर चार पैसे गाठीला येतील. तसेच अभ्यास केला तर अधिकारी होऊ. म्हणून त्याने काम आणि अभ्यास यांचा समतोल साधला. जिद्द,चिकाटी, सातत्य हेच यशाचे गमक आहे , आर्थिक परीस्थितीचा बाऊ न करता अभ्यास करा असे तो म्हणाला .आईने मोलमजुरी व आशा स्यंयसेविकाचे काम करून शिक्षणासाठी पैसे पुरवले. आईची प्रेरणा घेत पुण्याला शिक्षणासाठी न जाता राजगुरुनगर येथील बाळासाहेब आपटे अभ्यासिकामध्ये अभ्यास केला. चार वर्षाच्या संघर्षानंतर निखिल भोगाडे यांची एमपीएसी मार्फत ASO, STI पदी निवड झाली. बहिणी व कुटुंबातील मित्रमंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

Share this content:
