प्रतिनिधी- मनोहर गोरगल्ले
बुधवार दिनांक 19 /6 /2024 रोजी खेड पोलीस स्टेशनच्या वतीने वाढते अपघात व अपघातात होणाऱ्या मृत्यूस आळा घालण्यासाठी तसेच शाळा कॉलेज या ठिकाणी मोटरसायकलचे कर्कश आवाज काढणे ,मोठ्याने हॉर्न वाजविणे, व हुल्लडबाजी तसेच हिरोगिरी करणारे टपोरी मोटरसायकल चालकांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पदके तयार करून धडक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण वीस मोटरसायकल स्वरांवर खटले भरून व दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यात देणारे वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई मध्ये खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व दुय्यम अधिकारी वाहतूक नियमन अमलदार तसेच पुरुष व महिला पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता . सदरच्या कारवाई बाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सदरचे कारवाई यापुढे देखील अशीच चालू राहणार असल्याचे सांगितले.


Share this content:
