प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
शिलवंत अर्जुन गायकवाड(उपशिक्षक)यांची श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथून जातीयवादी मानसिकतेतून झालेली बदली रद्द करण्यासाठी मा. रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय राज्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की श्री. गायकवाड शिलवंत अर्जुन हे शिक्षक जातीने महार असून आपल्या श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. विद्यार्थी पालक नागरिक यांच्याशी ते अत्यंत आत्मियतेने वागत असतात. चाकण परिसरात गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, पालकांना आधार देणे, सामाजिक सलोखा राखणे त्यात महत्वपूर्ण योगदान देतात. कोरोना काळात चाकण व परिसरातील बेघर गरजू लोकांना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या मदतीने अन्न, वस्त्र, निवारा, पुरवण्याचे काम केले आहे, त्याबद्दल चाकण मधील विविध सामाजिक संस्थांनी सन्मान केलेला आहे. महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचे काम चांगल्या पद्धतीने करतात, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये त्यांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय आहे, याच कारणावरून त्यांचा समाजाशी संपर्क कमी होण्याच्या दृष्टिने त्यांची बदली अत्यंत गैरसोयीच्या ठिकाणी केलेली आहे. शाळा हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे, येथे देशाचे नागरिक घडवले जातात अशा ठिकाणी सामाजिक समाजातील काम करणाऱ्या शिक्षकास अशी जातीयवादी मानसिकतेतून वागणूक मिळत असेल तर हे चिंतनिय बाब आहे. आम्ही आपणास अत्यंत नम्रपणे विनंती करतो की, श्री गायकवाड शिलवंत अर्जुन यांची झालेली बदली त्वरित रद्द करण्यात यावी व सरांच्या कामास योग्य न्याय द्यावा. अन्याथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य आखिल माथाडी व जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष, खेड तालुका युवक अध्यक्ष आकाशभाऊ डोळस यांच्या नेतृवाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी निवेदन देताना पुणे जिल्हा उपाध्यक्ष RPl ( A) महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष व खेड तालुका युवक अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। आकाश भाऊ डोळस , सिद्धार्थभाऊ अनिल पवार अनेक कार्यकरते उपस्थित होते
Share this content:
