प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
निमगाव बीट अंगणवाडी येथे ० ते ६ वर्षा खालील बालकांचे अभा कार्ड काढण्यासाठी बालकांचे आधार कार्ड अवश्यक असल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाच्या साह्याने व सेविकांच्या मदतीने निमगाव व दावडी, मांजरेवाडी, गोसासी, कनेरसर व पूर या सहा ग्रामपंचायत मधील सर्व अंगणवाडी केंद्रातील शंभर पेक्षा जास्त मुलांचे चार दिवसांत आधार कार्ड काढण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्याच्या दिवसात शेतीची कामे चालू असताना सुध्दा सर्व पालकांनी आपल्या मुलांना ग्रामपंचायत व अंगणवाडी या ठिकाणी घेऊन येऊन आपल्या मुलांचे आधार कार्ड काढून घेतले.हे नविन आधार कार्ड काढून दिल्याबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले व मनपूर्वक आभार मानले.
Share this content:
