प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर विधानसभा महिला आघाडी प्रमुख निशिगंधाताई थोरात यांनी महिला आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला.
आज १९ जून रोजी शिवसेना पक्षाला ५८ वर्षे पूर्ण झाली, हिंदरुदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी हा पक्ष सुरू केला आणि हा वारसा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब पुढे नेत आहेत.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघाने १००० झाडे लावण्याचा निर्धार केला आहे.५८ व्या वर्धापन दिनानिमित्त हडपसर विधानसभा महिला आघाडी प्रमुख निशिगंधाताई थोरात यांनी हडपसर विधानसभा महिला आघाडीच्या वतीने हडपसर मतदारसंघातिल केशवनगर लोणकर वस्ती येथे वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी हडपसर विधानसभा महिला आघाडी उपसंघटीका आशा कांबळे, हडपसर विधानसभा उपविभागप्रमुख अर्चना सुर्यवंशी,हडपसर विधानसभा महिला आघाडी उपसंघटीका ज्योती गागडे, केशवनगर प्रभाग प्रमुख गंगा पाताळे, केशवनगर शाखा प्रमुख निर्मला बम्मा, लोणकर वस्ती शाखाप्रमुख शारदा दरवडे, केशवनगर प्रभाग प्रमुख अनिता कारागीर आणि तेथील परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Share this content:
