

प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
आरडगाव ता. फलटण येथील ग्रामपंचायतीचे नुतन संरपंच म्हणून राष्ट्रीय परिवर्तन संघाच्या मानकरी सौ रुपाताई अंकुश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यावेळी त्यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यावेळी आरडगाव ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी राष्ट्रीय परिवर्तन संघाचे मानकरी.उपस्थित होते.सौ रुपाताई अंकुश जाधव यांची निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे .संरपंच सौ रुपाताई जाधव यांचे माहेर मौजे भोसलेवाडी ता. पुरदंर हे आहे.मौजे आरडगाव मध्ये एकच समाजाचे कुटुंब आहे.त्या कुटुंबातील कायम ग्रामपंचायत वर सदस्य निवडून जातो.यावेळेस संरपंच पदाची संधी त्यांना मिंळाली. राष्ट्रीय परिवर्तन संघाच्या स्थापनेत या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे.संरपंच सौ रुपाताई जाधव यांना भावी वाटचालीसाठी राष्ट्रीय परिवर्तन संघाच्या वतीने खुप खुप शुभेच्छां देण्यात आल्या.
Share this content:
