प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर एस.टी.डेपोच्या समोर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशी.शाळकरी मुले यांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे..आजपर्यंत अनेकजण त्या खड्ड्यांमध्ये पडले.जखमी झाले.अनेकांची कपडे खराब झाली.परंतु डेपोतील अधिकार्यांनी याची दखल घेतली नाही.तरी या निवेदनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की सदर जीवघेणे खड्डे संबंधित अधिकार्यांनी ताबडतोब सीमेंट काँक्रीट ने बुजवावे अन्यथा पुणे जिल्हा शिवसेना (उ.बा.ठा)ग्राहक कक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे लेखी लेखी निवेदन.डेपोतील अधिकारी श्री अनंत कुंडे ( स. का. अ.)यांच्याकडे देण्यात आले आहे.निवेदन देताना पुणे जिल्हा शिवसेना (उबाठा) ग्राहक कक्षाचे.जिल्हा कक्ष प्रमुख श्री बाळासाहेब ताये,जिल्हा उपकक्ष प्रमुख श्री बाळासाहेब गारगोटे,जिल्हा
प्रसिद्धी प्रमुख.मनोहर गोरगल्ले.खेड तालुका कक्ष प्रमुख.ज्ञानेश्वर गोरडे.जेष्ठ शिवसैनिक श्री भरत पवळे , रा. नगर शहर कक्ष प्रमुख.दत्ता भांबुरे , उपकक्ष प्रमुख श्री अशोक वाळुंज व अजित डोळस उपस्थित होते.त्याबरोबर डेपोतील अधिकारी.दीपक पवार,स्नेहा कातोरे,पुष्पा चासकर,मनिषा सुतार हजर होते.
…यावेळी मुख्य अधिकारी श्री अनंत कुंडे (स. का.अ.)यानी त्वरित खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.
Share this content:
