निमगाव, दि.२६
प्रतिनिधी – दत्ता भगत
खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा(देऊळवाडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आदर्श उद्योजक दिलीपशेठ रेटवडे ,भोसरी याचकडून एलईडी टीव्ही स्नेह भेट देण्यात आलेला आहे. यावेळी हनुमंत येळवंडे अध्यक्ष व्यवस्थापन समिती, सोपानराव शिंदे उपाध्यक्ष ,दिलीप भगत उपसरपंच , महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरचे संपादक मनोहर गोरगले, चेअरमन सोपानराव शिंदे,आदर्श मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ साळे,आदर्श सहशिक्षक संतोष डुबे आणि निमगावातील विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत एलईडी टीव्ही मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला क्रीडा, व्यापार ,वाणिज्य, विविध शैक्षणिक बातम्याची माहिती मिळेल असे स्पष्ट मत संतोष डूबे यांनी व्यक्त केले आहे.शाळेस एलईडी टीव्ही मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Share this content:
