प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले पुणे येथे ,पर्वती टेकडीवर आर्ट ऑफ लिव्हिंग, रेणुका स्वरूप मुलींची शाळा NCC विभाग यशोधिनी कुलकर्णी , व भावे हायस्कूल मुलांची शाळा NCC विभाग यांचे सर्व NCC विद्यार्थि व शिक्षक व प्राध्यापक व काही भिशी मंडळ (लिंगायत समाज) 134 वृक्षांची लागवड (वड पिंपळ, लक्ष्मी तरू) करण्यात आली.
त्याकरता हवेली तहसीलदार (मावळ) तृप्ती कोलते पाटील मॅडम स्वतः उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्या शिक्षकांची ओळख व सत्कार करण्यात आला. मग सर्वांनी वृक्षारोपण केले. मेडिटेशन व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाचे नियोजन आर्ट ऑफ लिव्हिंग क्लीन ग्रुप तर्फे टीचर पराग गुजराती, जमदाडे परिवार व अश्या सर्व शिक्षक व सेवक यांनी व त्यांच्या समूहाने केले होते.
Share this content:
