
प्रतिनिधी – मधुकर दौंडकर
खेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पाचव्या दिवसांचे कीर्तन ह.भ.प. पोपट महाराज राक्षे यांचे झाले . भक्ती या विषयावर अनेक तोला मोलाचे दाखले दिले .भक्ती म्हणजे काय ,भक्ती कशी करावी, अंतरिक भक्ती, बाह्य भक्ती अशा व्यक्तींचे वेगवेगळे मार्ग त्यांनी सांगितले .भक्ती अशी एक शक्ती आहे की ती मनुष्य प्राण्याचे जीवन बदलू शकते. दुपारी चार ते पाच या वेळेत ह.भ.प. मुरलीधर महाराज शिंदे खरपुडी बुद्रुक यांचे प्रवचन झाले .हरीजागर साईनाथ भजनी मंडळ ,मांडवळा कालिका माता भजनी मंडळ भगत वस्ती यांनी केले.कीर्तनकार महाराजांचे सौजन्य ज्ञानेश्वर नारायण बरबटे मा. चेअरमन यांनी दिले . विना पहारा व पंगत सौजन्य सर्व बरबटे कुटुंबीय यांनी दिले.मी सेवेकरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे यांनी या अखंड हरिनाम सप्तहाच्या कार्यक्रमास सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. रेटवडी, खरपुडी, निमगाव आणि पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त तसेच खरपुडी गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ,ग्रामस्थ आणि भाविक भक्त कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तन सेवा संपल्यानंतर सर्व भाविक भक्तांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. या सप्तहा मंडळाचे आयोजन आणि नियोजनाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे . सप्ताहाच्या सूत्रसंचालनाचे कामकाजाची जबाबदारी आदर्श नेतृत्व चैतन्य गायकवाड उत्कृष्टपणे पार पाडत आहे .
Share this content:
