
प्रतिनिधी-संतोष गाडेकर
राजगुरुनगर:- ता. खेड दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी हॉटेल सयाजी पॅलेस ( 7 स्टार) कोल्हापुर येथे व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्त दूध माजी. उपसभापती पंचायत समिती खेड मा. श्री सतीश राक्षे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या देशामध्ये वाढची व्यसनाधीनता व मधु मेह ही एक जागतिक समस्या बनली आहे. हा पुरस्कार ज्यांनी मला दिला त्यांना डेडिकेट करतो व अभिनंदन माझ्या कुटुंबातील परिवाराने मला साथ दिली प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी झाले त्यांचे मी ऋणी आहे. ज्या व्यक्तींनी समर्थ सोशल फाउंडेशन ही ज्योत पेटवली आहे असे आमचे लाडके संस्थापक माननीय सादिक शेख व सर्व संचालक यांचे कौतुक करतो. समाजातील हजारो व्यक्ती याचा फायदा घेत आहे सर्वांना त्याचा लाभ मिळत आहे माणसाने माणसासाठी सतत सहकार्य करण्याची माझी भावना आहे व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्ती, वेदना मुक्ती, रोगमुक्ती सर्व समस्यांचे निवारण व्हावे असे माजी उपसभापती पंचायत समिती तालुका खेड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कोल्हापूर येथे जनसमुदायांमध्ये खेड तालुका राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक ज्येष्ठ व्यक्ती यांच्यामध्ये त्यांच्या कार्याबद्दल सर्वांनी कौतुक केले कोल्हापुरी येथे कार्यक्रम यशस्वी झाला
Share this content:
