प्रतिनिधी-सचिन राक्षे
नाणेकरवाडी येथील युवा कारकर्ते मा. लक्ष्मण राव जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे जिल्हा उपसंघटक पदी निवड करण्यात आली.त्यांनी पक्ष्याच्या माध्यमातून अनेक पदे भुषवली आहे ते शिवसेना शाखा प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, उप तालुका प्रमुख, ग्राहक सरंक्षण कक्ष उप जिल्हा प्रमुख तसेच पुणे जिल्हा ग्रामस्वचता अभियान समितीच्या संचालक पदी काम केले आहे. तसेच गेली 30 ते 40 वर्षे पक्ष्याच्या माध्यमातून जनसंह भागातून अनेक उपक्रम निरपेक्ष भावनेने राबवले व राबवत आहे. समाजातल्या तळागाळातल्या सामान्य माणसाची जाणीव ठेऊन ते काम करत आहे. तसेच त्यांनी अनेक जन आंदोलनात सहभाग घेऊन अनेक प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यामध्ये डाऊ हटाव, शेतकऱ्यांच्या कांदा आंदोलन, महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी यांच्या विरोधात आंदोलन तसेच चाकणच्या PAC चे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्यास प्रखर जन आंदोलन तसेच चाकण एस टी स्टॅन्ड होण्यासाठी शासन व प्रशासन पातळीवर अनेक वेळा पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला. रक्तदान शिबिराचे आयोजन केले, संजय गांधी योजनेद्वारे निराधार यांना मदतीचा हात असे अनेक उपक्रम समाजामध्ये राबवले आहे. तसेच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक आहे.
Share this content:
