

प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले.
कनेरसर ता. खेड जि. पुणे या मुळं गावी भारताचे सर न्यायधीश डाँ. धनंजय चंद्रचूड साहेब यांनी कनेरसर येथील आपल्या पुर्वजांच्या भव्य वाड्यात भेट देऊन येमाई देवीचे दर्शन घेतले व त्यांचा ग्रामस्थ यांचे वतीने भव्य सन्मान सोहळा पार पडला. यावेळी राजगुरूनगर कोर्टाचे मुख्य न्यायाधिश मा. ए. एस. सय्यद साहेब, मा. एस. बी. पोळसाहेब , मा. एस. बी. पवार साहेब खेड तालुका वकील बार असोशियशनचे अध्यक्ष. अँड. रोहिदास भीमाशंकर टाकळकर,यांचे वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व ग्रामस्थांनी जो सत्कार केला त्या बद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला ॲड निलेश बाजीराव मोहीते.अँड. मुकुंद आवटे, अँड. माऊली रोडे, अँड. देविदास शिंदे, अँड. दिलीप करंडे, अँड. प्रकाश तळेकर, अँड. अरुण मुळूक, अँड. संदीप घुले,अँड. भुषण तांबे,, व सर्व वकील सभासद,प्रांतसाहेब, तहसीलदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Share this content:
