प्रतिनिधी – उत्तम खेसे सर
घोडेगाव ,ता. आंबेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील पडीक जागेत प्राचार्य चंद्रकांत नाईकडे यांनी सोयाबीनचे पिक घेऊन 6 क्विंटल उत्पादन घेण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. जुलै-२०२४ महिन्यात शाळा आवारातील दीड एकर पडीक जागेत स्वतःचे आवश्यक ते आर्थिक भांडवल गुंतवून 35 किलो सोयाबीन बियाणांची पेरणी केलेली होती.दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मशीनच्या साहाय्याने काढणी केलेल्या सोयाबीनची मळणी करण्यात आली.एकूण 6 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत नाईकडे यांनी दिली.या सोयाबीन उत्पादनातून ₹24,000/- आर्थिक उत्पन्न मिळाले असून भांडवल रु.12000/- वजा जाता उर्वरित रक्कम रु.12000/- निव्वळ नफा झाला असून सदर नफ्याची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर खर्च करणार असल्याचे चंद्रकांत नाईकडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच शेतीविषयक ज्ञान मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा अभिनव उपक्रम राबविला असल्याचे प्राचार्यांनी म्हटले आहे.मशागतीपासून ते सोयाबीन मळणीपर्यंतची प्रक्रिया या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना समजली व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उस्फुर्तपणे सक्रिय सहभाग घेतला.या उपक्रमात प्राचार्य व अधीक्षक यांचेसह कर्मचारी अनिल घुले,यशवंत गेंगजे,मछिंद्र बाळसराफ,रत्नमाला नाडेकर,आशा भागवत, फसाबाई वडेकर,छाया भारमाळ,कविता भास्कर,सविता वाजे यांनी विशेष मेहनत घेतली.घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Share this content:
