प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पुणे: ईशानी सागर शिंदे हिने अरबी समुद्रात पोहण्याचा विक्रम नोंदवला आहे. ईशानी ने लाईट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया हे सात किलोमीटर अंतर दोन तास एकोणतीस मिनिटात पोहत पार करून विक्रमाला गवसणी घातली आहे. ईशानी सागर शिंदे हि सर्वात कमी वयात हे अंतर पोहून पार करणारी मुलगी ठरली आहे. तिच्या ह्या विक्रमाची रेकॉर्ड बुक मध्ये देखील नोंद घेण्यात आली आहे. ईशानी हिने १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रोंग लाईट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया हे सात किलोमीटर अंतर अवघ्या २ तास एकोणतीस मिनिटात पोहत पूर्ण केले. तिच्या या साहसा बद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दल सर्वजन तिची प्रशंसा करीत आहेत. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या रुपाली रेपाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ईशानी ला यासाठी सुनील भिसे आणि तुषार शिगारे यांचे मार्गदर्शन लाभले. इतक्या लहान वयात इतिहास घडवणारी इशा जलपरी या नावाने प्रसिध्द आहे. ईशानी ची आई प्राजक्ता आणि वडील सागर हे दोघेही व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत. आपल्या मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल आपल्याला अभिमान आहे असे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
Share this content:
