
प्रतिनिधी- मनोहर गोरगल्ले राजगुरुनगर शहरातील झालेल्या भयानक आणि किळसवाण्या प्रकरणातील कार्तिकी व दुर्वा सुनिल मकवाने यांच्या आरोपीला तत्काळ जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी आज निवेदन देण्यात आले.
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत राहणाऱ्या कार्तिकी सुनिल मकवाने (वय ९) व दुर्वा सुनिल मकवाने (वय ८) नऊ आणि आठ वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला होत्या मोलमजुरीसाठी आलेल्या या कुटुंबियातील मुली आपल्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी आल्या होत्या. चौकशीनंतर असे दिसून आले कि, पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळुन आल्या आहे. आरोपी हे राजगुरुनगर येथील एका बार मधील वेटर असून ५० ते ५५ वर्षीय परप्रांतीय आहे. बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीयांना खोली कोणी दिली? बियर बार वर काम करणार आहे यासाठी त्यांचे चारित्र्य दाखला घेतला होता का? त्यांची सखोल चौकशी केली होती का ? आरोपीला अटक झाली आहे मात्र त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. गावातून त्याची धिंड काढावी. म्हणजे असे कृत्य करण्याच्या आधी चार वेळा विचार केला पाहिजे. आज पर्येंत खूप वेळा असे भयानक आणि किळसवाणे प्रकार झाले आहे. जर आरोपीला भर चौकात शिक्षा नाही दिली तर त्याच्यात पोलिसांचा धाक राहणार नाही. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा आरोपीला तत्काळ शिक्षा द्या व असे न केल्यास श्री आकाश भाऊ शांताराम डोळस जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी आणि जनरल कामगार संघटना तालुका खेड जिल्हा पुणे अध्यक्ष तंटामुक्ती उपाध्यक्ष खरपुडी खु ।। यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण खेड तालुक्यात आंदोलन करण्यात येईल.यावेळी समाज सेवक निखिलभाऊ थिगळे बजरंगदल संयोजक, राजगुरूनगर शहर प्रखंड. , समाजसेविका रोशनताई घुमटकर , समाजसेवक विनायक भाऊ अंकुश अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
Share this content:
