
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
कनेरसर शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी कु.अर्णव राहूल गायकवाड याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर खर्चास फाटा देऊन त्याचे पालक भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ चे शिक्षक श्री. राहूल गायकवाड सर व कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शुभांगीताई जाधव यांनी कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या च्या ९२ विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याचे ठरविले.खेड बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्रीम.सोनाली झिंजुर्डे मॅडम यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास खेड बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.सोनाली झिंजुर्डे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अंजली शितोळे, उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका राक्षे,श्री. फकिरा पोखरकर,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीम अंजली शितोळे यांनी केले,तर आभार श्रीम.सारिका राक्षे यांनी मानले.
Share this content:
