प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
धामणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील
सक्षम मनोज चित्ते( वय ७ वर्ष )
आणि समीक्षा मनोज चित्ते (वय ९ वर्ष) या भावंडांचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK अंतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.मायेचे छत्र हरवलेल्या या दोघा बहीण भावंडांचा सांभाळ त्यांची आजी आणि वडील कर आहेत. वडिलांची परिस्थिती ही खूप जेमतेम व हालाखीची अशा स्थितीत आर. बी. एस. के. पथक क्र.१ आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे येथे आले असता तपासणी दरम्यान दोन्ही बहीण भावाच्या ह्रदया मध्ये काही तरी समस्या असल्याची शंका त्यांना आली. सदर गोष्टीची कल्पना त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आली. हॉस्पिटल पर्यंत नेण्याचीही परिस्थिती पालकांची नव्हती त्यावेळी शिक्षकांनी पुढाकार घेऊन त्यांना ज्युपिटर रुग्णालय येथे पोहोचवले. तिथे निदानानंतर दोघांनाही ऑपरेशनची गरज असल्याचे समजले. तेव्हा पासून त्यांच्या पालकांना वारंवार समजून सांगून त्यांच्या मनाची तयारी करण्यात आली व आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता शाळा व तपासणी पथकाकडून करण्यात आली. अखेर या दोघांचे ASD closer ची ह्रदय शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे येथे यशस्वीरित्या पार पडली. दोघांचीही प्रकृती एकदम उत्तम व स्थिर असल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डाॅ.अमोल पारधे यांनी दिली. आर.एस.बी.के. खेड पथक क्रमांक एकचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल पारधे, डॉ. स्नेहा भोंडवे, औषध निर्माण अधिकारी रेश्मा भुजबळ, परिचारीका सुवर्णा साळवे, जिल्हा समन्वयक आशिष पुरनाळे, शिक्षक मंगल पिंगळे, अमर केदारी, गोरख नवले, मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.याकामी जिल्हा शल्य चिकित्सक औंध पुणे , वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चांडोली, ज्युपिटर हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय चांडोली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) पथक, अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्याबद्दल धामणे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले.
Share this content:
