
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 54 / 2025 भारतीय न्याय संहिता कलम 318 (4),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हकिकत असी कि श्री विक्रांत गणेश दाभाडे व 19 वर्षे धंदा व्यवसाय,राहणार राधाई बंगला माळवाडी, पोस्ट इंदोरी, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यास फिर्याद दिली की दिनांक 03/03/ 2025 रोजी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी माझ्या मालकीच्या घरी ओम ज्वेलर्स नावाचे दुकानात असताना अज्ञात 2 व्यक्तींनी बनावट सोन्याची चैन मोडण्याकरिता घेऊन येऊन ती खरी सोन्याची चैन असल्याचे सांगून ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. अशी फिर्याद दिल्याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 3 ( 5 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.विवेक गोवारकर हे करीत होते .सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद रावण व पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर यांनी आपल्या खबर्यांचे जाळे तयार करून व गोपनीय बातमीदार मार्फत सदर गुन्हा करणारी व्यक्ती 1 ) गणेश शिवाजी भिंगारे वय 36 वर्ष राहणार फणसडोंगरी पेन, तालुका पेन, जिल्हा रायगड व 2 ) राकेश भवानजी पासड वय 42 वर्षे राहणार अर्चिड बिल्डिंग स्केअर 2 रूम नंबर 201 पहिला मजला अंबरनाथ वेस्ट यांचे बाबत माहिती प्राप्त केली.नमुद इसमांना अटक करण्यात करिता मदत केली. गुन्ह्यातील फसवणूक रक्कम रुपये 70 हजार व पिवळे धातूची बनावट चैन हस्तगत करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर ,पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर, पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारी, पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे, पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे ,पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले, यांनी उघड चांगला आहे. गुन्हा उघडकीस आणण्या करिता पोलीस आयुक्त श्री विजयकुमार चौबे ,सह पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त श्री विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजीत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
Share this content:
