सुदर्शन मंडले -आळेफाटा प्रतिनिधी
आळेफाटा ता. ३१ आळेफाटा पंचक्रोशीतील भटकळवाडी , पिंपळवंडी परिसरातील गणेश भारत लेंडे यांची घरासमोरील मोकळ्या जागेतून हॅन्डल लॉक करून ठेवलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल क्र. एम.एच. १४ एस.एल २२२३ चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात दोन आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३, ५१, ०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यांचा तपास करीत असता आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्टाफ ला सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या. त्यानुसार अज्ञात आरोपीचा माग काढत रोहन अनिल अभंग (वय २८ वर्षे )रा. देवाचामळा, संगमनेर ता संगमनेर जि. अहिल्यानगर यांस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्हाची सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा आरोपी हनुमंत सिताराम गर्जे (वय २९वर्षे )रा. आंबलवाडी, ता. अंबेजोगाई जि. बीड यांच्या मदतीने केला असून सदरची बुलेट मोटार सायकल एम.एच. १४ एस.एल २२२३ असल्याची कबुली दिली. तसेच दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा येथून टी. व्ही. एस. कंपनीची रायडर डिस्क मॉडेल ची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र. एम. एस. २२सी. ई. ०९१६ ही पण चोरी केल्याची कबुली दिली.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रविंद्र चौधर,पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पो. हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, पंडित थोरात, पो. कॉ. नवीन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली.
Share this content:
