
प्रतिनिधी- मनोहर गोरगल्ले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नितीन पांडुरंग गुरव यांची नियुक्ती सहकार विभाग प्रदेशाध्यक्ष रामदासजी मोरे यांनी केली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी शेळके, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय देशपांडे, पुणे शहर अध्यक्ष राहुल गुंड ,अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष वसीम पटेल हे उपस्थित होते .माजी आमदार दिलीप दिलीप मोहिते पाटील खेड तालुका अध्यक्ष कैलासराव पाटील व सर्व तालुक्यातील नितीन गुरव यांना शुभेच्छा देण्यात आले.नितीन गुरव यांनी एमकॉम केले असून सहकार विभागातून सहकार व्यवस्थापन हा कोर्स पूर्ण केला आहे तसेच जीडीसी अँड ए ही पदविका पूर्ण केली आहे त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा औद्योगिक विभाग काम केले आहे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग याची जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार विभागाच्या माध्यमातून सहकाराची नवीन धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच सहकारी सभासद साठी योजना राबवून आर्थिक सक्षमीकरण करणे, सहकार चळवळ चांगल्या प्रकारे बळकट करून सर्वसामान्य जनते साठी नवीन धोरणे योजना राबवून तळागाळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सहकार विभाग पोहोचवणे असे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.नितीन गुरव यांनी सांगितले सरकार विभाग क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सहकारी बँक दूध उत्पादक संघ, गृहनिर्माण संस्था संचालक यांच्या गाठीभेटी घेऊन सहकार क्षेत्रातील समस्यांचा आढावा घेणार आहे .सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार विभाग प्रदेशाध्यक्ष रामदासजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीला बळकटी देऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे.
Share this content:
