प्रतिनिधी संतोष गाडेकर राजगुरुनगर:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा ता. खेड सन २०२५- २६ या नवीन शैक्षणिक वर्षासाठी नव्याने विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेत आहे सुंदर अशा वातावरणामध्ये दिमाखात नवीन विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे शाळेच्या पहिल्या दिवशी रंगीबिरंगी कपड्यांमध्ये छोटी चिमुकले मुले आपल्या पालकांसह शाळेमध्ये उपस्थित होते. शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आकर्षित फेटे बांधून विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर- ट्रॉली मधून ढोल ताशाच्या गजरामध्ये गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि आम्ही चिमुकले मुले आमच्या शाळेत चाललो मोठ्याने घोषणा देत होते. विद्यार्थी व पालक रानमळा गावातील शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावे असे आव्हान करण्यात आले सर्व विद्यार्थी मिरवणुकीनंतर शाळेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये एकत्र येऊन सर्व विद्यार्थ्यांचे महिलांच्या वतीने व शिक्षिका यांच्या हस्ते औक्षण करण्यात आली सर्वांना पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला मॉर्डन स्कूलच्या माध्यमातून रानमळा शाळा जिल्ह्यामध्ये अव्वल होण्यासाठी आवश्यकता आहे सर्वांनी मदत करावी असे आव्हान माजी शिक्षण अधिकारी पुणे जिल्हा परिषद माननीय आदरणीय श्री सिद्धार्थ चव्हाण साहेब यांनी सांगितले गावातील ग्रामस्थ पालक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शालेय विकास सर्वांनी मेहनत घ्यावी असे मार्गदर्शन केले. राजगुरुनगर मधील रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर अध्यक्ष राजन जांभळे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले यांच्यावतीने विद्यार्थ्यांना वह्या पेन , पेन्सिल बॉक्स बिस्किट पुडे टिफिन बॉक्स, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्त राष्ट्रपती पारितोषिक विजेते जिजाबा शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती शिंदे, उपाध्यक्ष शैलेश बनकर, माजी अध्यक्ष नवनाथ वाघोले, माजी उपसरपंच उल्हास भुजबळ, युवा उद्योजक निलेश शिंदे, पालक प्रवीण जाधव सर्व महिला वर्ग पालक वर्ग उपस्थित होते यांनी सर्वांचे कौतुक केले. विद्यार्थी पालक यांना स्नेहभोजन सुरुचे भोजन देण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन आदर्श शिक्षक संपत गायकर सर यांनी केले कार्यक्रमाचे संयोजक शाळेचे आदर्श मुख्याध्यापिका सौ सुनंदा ढमाले, बाबाजी शिंदे, सलीम शेख, कविता बनकर यांनी केले मुलांचे स्वागत करून शाळेचा पहिला दिवस संपन्न करण्यात आला
Share this content:
