
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
दिनांक 13 जून 2025 रोजी शासकीय विश्रामगृह सासवड ता.पुरंदर येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांची जनसंवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष श्री.अंकुशरावजी जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष श्री.सुधीरजी (दादा) नाईक म्हणाले की पुरंदर तालुक्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सर्व तालुक्यांमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या युवक पदाधिकाऱ्यांचे संघटन वाढवणार, नवनवीन युवकांना युवक पदाधिकारी म्हणून काम करण्यास संधी देणार व युवकांची मोठी ताकद महाराष्ट्रात उभारून जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांचे हात बळकट करणार तसेच युवकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी आवाज उठवत युवकांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन युवक अध्यक्ष सुधीरजी दादा नाईक यांनी केले.यावेळी श्री उमेश भाऊ मंडले श्री अशोक चव्हाण श्री चंद्रकांत खोमणे श्री गंगाराम जाधव श्री विष्णू आप्पा चव्हाण श्री अविनाश जाधव श्री विकास भांडवलकर श्री राहुल चव्हाण श्री सूर्यकांत चव्हाण श्री निलेश जाधव
श्री निलेश भांडवलकर श्री महेश बोडरे श्री राहुल खोमणे श्री गणपत शितकळ श्री लालासाहेब भंडलकर श्री साहेबराव जाधव श्री खंडू जाधव
उपस्थित होते.
Share this content:
