प्रतिनिधी संतोष गाडेकर
राजगुरुनगर:-खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय बाबाजी शेठ काळे यांनी पाऊन लाख विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड देऊन शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यांच्या संकल्पनेतून पहिल्या दिवशी वेगळ्या पद्धतीने शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थी स्वागत पत्र बनून प्राथमिक शाळेतील ३८००० विद्यार्थी व माध्यमिक शाळेतील ३७००० या सर्व विद्यार्थ्यांना वाटप केले त्यांनी स्वतः निघोजी प्राथमिक शाळा व कुरुळी येथील जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांना वेलकम कार्ड भेट दिली आमदार माननीय बाबाजी शेठ काळे, व सुविद्य पत्नी माजी सरपंच वैशाली ताई काळे यांनी पाडळी येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची हितगुज साधत आमदार वेलकम कार्ड देण्यात आले या उपक्रमाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूल कुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकरे, खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय अमोल जंगले , निघोजे गावचे सरपंच यांच्या गावातील विविध पदाधिकारी व पालक , सर्व शिक्षकांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांना भेट दिल्याबद्दल छोट्या बालकांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून आला आजचा शाळेचा पहिला दिवस आनंद दायी सुंदर शालेय वातावरणा त शाळे मध्ये मोठ्या दिमाखात उत्साहात साजरा झाला
Share this content:
