प्रतिनिधी संतोष गाडेकर राजगुरुनगर:- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील शिरोली या गावांमध्ये आर डब्ल्यू ई व पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी.ता. मावळ पुणे जिल्हा यांच्यावतीने शेतकऱ्यांसाठी बियाणे प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जाधव सर, कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या कृषी कार्यानुभवाचे कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी विविध बियाणे प्रक्रियेतून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जाधव सर होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक प्रक्रियेच्या माध्यमातून बियाणे प्रक्रिया शेतकऱ्यांना माहिती दिली मार्गदर्शक समन्वयक डॉ. प्रशांत घाडगे, कृषी अधिकारी बांगर मॅडम, नवलकर मॅडम, यांनी बियाणे प्रक्रिया प्रात्यक्षिक याविषयी बीजामृत, गोमूत्र, थायरम प्रक्रिया रायझोबियम प्रक्रिया गरम पाणी यांचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले
कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या स्वप्नाली शिंदे, नम्रता नरळे, केनिशा वकारे, श्रद्धा गायकवाड वीर श्री सांगळे, यांनी या कार्यक्रमासाठी उत्तम प्रकारचे सादरीकरण केले गावातील शेतकरी वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यामध्ये अनेक गावातील मान्यवर शेतकरी वर्गामध्ये प्रामुख्याने राजेंद्र सावंत, सुधाकर सावंत, लहू सावंत, चंद्रकांत सावंत, एकनाथ सावंत, सिताराम बेंढाले, चिमण बेंढाळे, किसन वाडेकर ज्ञानेश्वर सावंत, रवी सावंत, विठ्ठल सावंत, गावातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होत्या सर्वांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळाले शिरोली मध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित आर डब्ल्यू ई अंतर्गत वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय यांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचे गावच्या वतीने आभार म्हणून कार्यक्रम संपन्न झाला
Share this content:
