
प्रतिनिधी उत्तम खेसे
खेड (दावडी ) : ता . २४ सतत अडीच महिने पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन पेरणी करता आली नाही .शेतीला वापसा नसल्यामुळे सोयाबीनच्या पिकाची लागवड १०%टक्के ही झाली नाही .त्यामुळे मोकळ्या पडत असलेल्या शेतात सतत तन , गवत मोठ्या प्रमाणात आले आहे . तननाशक औषध मोकळ्या शेताला मारणे हे शेतकऱ्याच्या खर्चाच्या अवाक्या बाहेर गेलेला आहे . कारण दोन दोन ते तीन फवारणी गभाळ गवत नाशक यांच्या होत आलेले आहेत . त्यामुळे शेतकरी मेटा कुटीस आलेला आहे .फवारणी पंप बिघडले आहेत त्याची दुरुस्तीसाठी ही खर्च येत आहे . त्यामुळे काही शेतकऱ्यांना नवीन पंप घ्यावे लागत आहे .शेतकऱ्याची व्यथा मांडणारे प्रगतशील शेतकरी तुकाराम खेसे, देवराम सातपुते ,राघू शिंदे यांनी सांगितले .श्री आनंदराव शिंदे यांच्या हार्डवेअरच्या दुकानातून शेतकऱ्यांना योग्य दरात शेतीसाठी लागणारे साहित्य पंप ,वॉटर सप्लाय पाईप, विळे खुरपे खोरी फावडी घमेले ‘लोखंडी दातळ हे सर्व साहित्य मिळते .शेतकरी ला वाटतय पाऊस ८ते १० दिवस उघडावा , शेतीची मशागत करता येईल . कांदयाची रोपे टाकण्याच्या तयारी ला शेतकरी लागला आहे . काहींनी रोपे टाकली आहेत .कांद्याचे पीक चांगले घ्यावे पैसे होतील अशी शेतकऱ्याला अपेक्षा आहे .शेतकरी कष्ट करतोय त्याला फक्त निसर्गाची साथ हवी आहे .
Share this content:
