प्रतिनिधी उत्तम खेसे
राजगुरूनगर :शिष्यवृती परीक्षा इयत्ता चौथी व सातवी ला या वर्षी पासून सुरू होणार .या प्रस्तावास शिक्षण आयुक्त यांनी हिरवा कंदिल दाखऊन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी होकार दिला .प्राथमिक शिक्षक संघटना यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळा यामध्ये घटत चाललेली विद्यार्थी संख्या ही बाब शिक्षण दादासाहेब भुसे यांच्या निर्दशनास आणून दिली . या वर्षी पासून चौथी , सातवी या वर्गांतील शिष्यवृती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे .
काही ठिकाणी मराठी शाळा चौथी किंवा सातवी पर्यंत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसता येत नसल्याने विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे .पाचवी व आठवीचा वर्ग नसल्यामुळे पालक ही या शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यास नाराज होते . ही बाब राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना श्री निलेश देशमुख यांनी शिक्षण मंत्र्या च्या निर्दशनास आणून दिली आहे . त्यासाठी लवकरच आदेश काढण्यात येणार आहे .यंदा शिष्यवृत्ती परीक्षा चार वर्गासाठी घेणार आहेत . इयत्ता चौथी , पाचवी, सातवी आणि आठवी या वर्गांचा समावेश होणार आहे .पुढील शैक्षणिक वर्षा पासून चौथी आणि सातवी या वर्गातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे .
Share this content:
