
प्रतिनिधी : उत्तमराव खेसे.
मुळशी [ पोमगाव ] : दि.३० जुलै -क्रिकेट , शैक्षणिक संस्था निर्माते , सिनेमा थियटर व्यवसाय इत्यादि क्षेत्रात भरारी घेणारे स्व : आप्पासाहेब तथा सदानंद मोहोळ यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने
त्यांच्या कार्याला दिला उजाळा .मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या एकूण ३७ शाखेत स्वर्गीय आप्पासाहेब मोहोळ यांच्या शैक्षणिक, सामाजिक , क्रिकेट क्षेत्रातील कार्याला उजाळा देऊन त्यांचा तृतीय स्मृती दिन साजरा झाला .मुळशी धरण प्रशाला पोमगाव या शाळेत कार्यक्रम साजरा झाला .स्मृती दिन सभेचे अध्यक्ष सोनवणे बी .एम हे ( मुख्यध्यापक ) . स्व आप्पासाहेब मोहोळ यांचा जीवन पट त्यांनी आपल्या भाषणात सांगितला .विज्ञान गणित शिकविणारे अध्यापक श्री उत्तम खेसे सर यांनी भाषणात सांगितले स्वर्गीय आप्पासाहेब मोहोळ यांचा सहवास पंचवीस वर्षे आमच्या सारख्या पामरांना पितृतुल्य समान लाभला हे आमचे भाग्य आहे . स्व . आप्पासाहेब यांनी आम्हाला आपुलकी ,प्रेम , .जिव्हाळा माणुसकी दिली .आम्ही देव पाहिला तो स्व आप्पासाहेबांच्या रूपात . गेली ती देवरूपी विभूती , मागे राही आठवणी जागवया .इयत्ता आठवीत शिकणारी अस्मिता शिनकर हीने ही भाषण केले . कात्रट सानिका हीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .प्रसिद्ध निवेदक अध्यापक श्री राजेंद्र नाईकरे सर यांनीही भाषण करून स्व आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन केले . या कार्यक्रमास वाकचौरे सर’, संतोष आवारी , किरण धायगुडे, भोसले मामा , भाषण करणारे विद्यार्थी , श्रोते विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते .
Share this content:
